Share

Ben Stokes : ‘या’ कारणामुळे घेतली बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला,‘मी माझे शंभर टक्के…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. यानंतर तो आता इंग्लंडसाठी टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. बेन स्टोक्स मंगळवारी (19 जुलै) शेवटचा एकदिवसीय सामना त्याचं घरच मैदान डरहमवर खेळणार आहे. इंग्लंडचा संघ हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्टोक्सने इंग्लंडसाठी १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.

स्टोक्सने एका निवेदनात सांगितले की, ‘मी मंगळवारी डरहम येथे इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. इंग्लंडकडून खेळताना मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आणि आमचा प्रवास अविश्वसनीय होता. तो पुढे म्हणाला की, हा निर्णय घेणे खूपच कठीण होते, परंतु आता या फॉरमॅटमध्ये माझ्या सहकाऱ्यांसाठी मी माझे शंभर टक्के योगदान देऊ शकत नाही हे देखील वास्तव आहे. इंग्लंडची जर्सी यापेक्षा कमी योगदानास पात्र नाही. त्यामुळे मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.’

सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक बेन स्टोक्स आहे. निवृत्तीबाबत बोलताना त्याने सांगितले की, ‘तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे माझ्यासाठी कठीण आहे. माझे शरीर शेड्यूलला सहकार्य करत नाही असे नाही. मात्र जोस आणि सहकाऱ्यांना सर्वोत्तम खेळ करून देऊ शकेल युवा खेळाडूंची मी जागा घेत आहे.’ तो म्हणाला की, ‘क्रिकेटपटू म्हणून प्रगती करण्याची आणि गेल्या ११ वर्षात माझ्याकडे असलेल्या अद्भूत आठवणी निर्माण करण्याची हीच वेळ आहे.’ स्टोक्स म्हणाला की, ‘आता मी माझे पूर्ण लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित करणार आहे. आणि या निर्णयामुळे मला असेही वाटत आहे की मी आता पूर्णपणे टी-२० फॉरमॅटला देखील समर्पित होईल. असेही बेन स्टोक्स म्हणाला.

https://www.instagram.com/p/CgJuAELj927/?igshid=YmMyMTA2M2Y=

स्टोक्सची एकदिवसीय कारकीर्द

स्टोक्सने वयाच्या २० व्या वर्षी २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ११ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ १०४ सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४० च्या सरासरीने २९१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर ३ शतके आणि २१ अर्धशतके आहेत. त्याचबरोबर या अष्टपैलू खेळाडूने ७४ बळीही घेतले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!