🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. यानंतर तो आता इंग्लंडसाठी टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. बेन स्टोक्स मंगळवारी (19 जुलै) शेवटचा एकदिवसीय सामना त्याचं घरच मैदान डरहमवर खेळणार आहे. इंग्लंडचा संघ हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्टोक्सने इंग्लंडसाठी १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.
स्टोक्सने ट्विटरवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, “मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझा शेवटचा सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूप छान होता. आता या फॉरमॅटमध्ये मी संघासाठी १०० टक्के योगदान देऊ शकत नाही. मी आता तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगले क्रिकेट खेळू शकणार नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.
स्टोक्सने पुढे लिहिले की, “माझ्यावर क्रिकेटचा बोजा वाढत होता असे नाही, तर मला असेही वाटले की मी एका युवा खेळाडूंची जागा घेत आहे. जो इंग्लंडसाठी खूप योगदान देऊ शकतो.” तो पुढे म्हणाला की, ‘मी कसोटी क्रिकेटला सर्वकाही देईन आणि आता या निर्णयामुळे मला वाटते की मी टी-२० फॉरमॅटमध्ये योगदान देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी जोस बटलर, मॅथ्यू मॉट, इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला पुढील यशासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. आम्ही गेल्या ७ वर्षांत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे भविष्याही खूप उज्ज्वल दिसत आहे.”
❤️???????????????????????????? pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
इंग्लंडला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात स्टोक्सचा मोलाचा वाटा
बेन स्टोक्सने २०१९ मध्ये इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक विजेता बनवले होते. स्टोक्सने संपूर्ण स्पर्धेत चांगली फलंदाजी करत ६६.४२ च्या सरासरीने ४६५ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीतही स्टोक्सने ८४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला प्रथमच विश्वचषक जिंकण्यात यश आले. याशिवाय स्टोक्सने या स्पर्धेत ७ बळीही घेतले होते.
11 years and countless ODI memories ❤️
Thank you, @benstokes38 ???? pic.twitter.com/TroqvkZwsw
— England Cricket (@englandcricket) July 18, 2022
बेन स्टोक्सची एकदिवसीय कारकीर्द
स्टोक्सने वयाच्या २० व्या वर्षी २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ११ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ १०४ सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ४० च्या सरासरीने २९१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर ३ शतके आणि २१ अर्धशतके आहेत. त्याचबरोबर या अष्टपैलू खेळाडूने ७४ बळीही घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड, तर दीपक केसरकर प्रवक्ते; नवीन कार्यकारणी जाहीर
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादवचं क्रिकेट प्रेम! पंतप्रधान मोदींनी दिला होता वजन कमी करण्याचा सल्ला; पाहा VIDEO!
- Urfi Javed | पहा उर्फी जावेद हिची ‘रिस्की फॅशन’; फ्रंट ओपन टॉप पाहून चाहते शॉक
- Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गट करणार स्वत: ची कार्यकारणी; ऑनलाईन बैठकीला 14 खासदारांची उपस्थिती
- IND vs ENG : बुमराहच्या गैरहजेरीत गोलंदाजीच्या जबाबदारी बाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

