Share

Anu Agrawal | आशिकी गर्ल अनु अग्रवाल यांनी शेयर केला ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबतचा जुना फोटो

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : आशिकी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अनु अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. अनु नेहमीच आपले विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. ज्याला तिच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम देखील मिळते. यावेळी आशिकी गर्लने असा फोटो शेअर केला आहे ज्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत अनु अग्रवाल नॉस्टॅल्जिक झाल्या आहेत.

अनु अग्रवाल यांनी इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. हे एका मासिकाचे मुखपृष्ठ आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चनसोबत अनु अग्रवाल दिसत आहेत. यासोबतच त्या काळातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या संगीता बिजलानी देखील दिसत आहे. या तिघांनीही काळे कपडे घातलेले आहेत. अमिताभ बच्चन यांनी अनु अग्रवाल यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि अनु यांनी त्यांचा हात धरला आहे. तर संगीता बिजलानी मागे उभ्या आहेत.

https://www.instagram.com/tv/CgJeGhzjwz8/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो पाहून अनु अग्रवाल याना जुन्या आठवणी आवठत असणार. अनु अग्रवाल या एक अग्रगण्य अभिनेत्री होत्या. आशिकी या एकाच चित्रपटानंतर त्या लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनल्या होत्या. त्यावेळी हे त्यांचे हे पहिले कव्हर फोटोशूट होते. ज्यामध्ये त्यांना अमिताभ बच्चनसारख्या दिग्गज कलाकारासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अमिताभ बच्चन आणि संगीता बिजलानी यांच्यासोबतचा अनु अग्रवाल यांचा हा फोटो पाहून चाहतेही त्यांचे कौतुक करत आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. आशिकी या चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या आणि बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अनु अग्रवाल काही चित्रपटांनंतर अचानक गायब झाल्या. त्यानंतर आता त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!