Share

Sanjay Raut : फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात?; संजय राऊत आक्रमक

Published On: 

Shivsena। दिल्ली : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केलं आहे.

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणले कि, फुटीर गटाच्या भवितव्याचाच प्रश्न खंडपीठात आहे. तर हा गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाला मान्यता नाही. त्यांचा पक्षही नाही. तरीही हे लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करत आहे, मात्र यांना असा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख पदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते नियुक्ती करण्यात आली आहे. 14 खासदार या बैठकीला होते का याबाबत मात्र काहीही थेट बोलणे केसरकर यांनी टाळले. सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती एका एका वृत्तवाहिनीमार्फत समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!