🕒 1 min read
Shivsena। मुंबई : शिवसेनेला लागलेली गळती आता थांबताना दिसत नाहीये. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दररोज अडचणी वाढताना दिसत आहेत. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांना वेगळं केलं. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. आता शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच आज एकनाथ शिंदे गट आता स्वत: ची कार्यकारणी तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यामध्ये शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच आणखी दोन खासदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहेत. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
तसेच शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला नवा गट स्थापन करणार आहेत. तसेच या नव्या गटाचे संसदेतील नेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच शिंदे गटाकडून आता खरी शिवसेना आमचीच यासाठीहि प्रबळ दवे केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ben Stokes : मोठी बातमी! इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमधून निवृत्त
- koffee With Karan : करण जोहरची फी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; सुपरस्टार अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मुख्य नेतेपदी निवड, तर दीपक केसरकर प्रवक्ते; नवीन कार्यकारणी जाहीर
- Tejashwi Yadav : तेजस्वी यादवचं क्रिकेट प्रेम! पंतप्रधान मोदींनी दिला होता वजन कमी करण्याचा सल्ला; पाहा VIDEO!
- Urfi Javed | पहा उर्फी जावेद हिची ‘रिस्की फॅशन’; फ्रंट ओपन टॉप पाहून चाहते शॉक


