🕒 1 min read
पुणे : आपल्या समाजामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना खूप खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. वेश्या व्यवसायावर सतत चर्चा चालूच असते. या व्यवसायावर कोण ना कोण आपली प्रतिक्रिया मांडतच असते. यामध्ये आता वेश्या व्यवसायावर अमृता फडणवीस यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे.
पुण्यामध्ये लाल बत्ती भागात भाजपने आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी पुण्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या, “वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमधे तर या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे. वेश्या व्यवसायामुळे समाजातील संतुलन राखलं जात आहे. या व्यवसायामुळे बलात्कार कमी प्रमाणत होत आहेत.”
“तुमच्या वेश्या व्यवसायाला सर्वोच्च न्यायालयाने देखील पाठींबा दिला आहे. तुम्हाला कोणतीही कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आणि सर्वजन तुमचे संरक्षण करण्यासाठी आहोत. तुम्हीही इतर माणसांप्रमाणे या समाजाचा एक भाग आहात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाईट प्रसंग आला तर तुम्ह कधीपण हाक मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत”. असा विश्वास अमृता फडणवीस यांनी महिलांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
