Share

Rajya Sabha election results : संजय पवार यांच्या पराभवामागील कारण प्रफुल्ल पटेल यांनी केले स्पष्ट; म्हणाले…

Published On: 

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी संजय पवार यांच्या पराभवामागील कारण स्पष्ट केले आहे.

“महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्या कोट्याप्रमाणे अपेक्षित मते मिळाली आहेत. मात्र काही छोट्या पक्षाची व अपक्षांची मते जी अपेक्षित होती ती संजय पवार यांना मिळाली नाही. त्यांची काही नाराजी असणार. मात्र, यावर आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करतील.”, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “अनिल देशमुख व नवाव मलिक यांना मतदानासाठी जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम झाला. राष्ट्रवादीकडे ५१ मते होती. मात्र आमचा ४२ मतांचा कोटा ठरला होता. तरी मला एक मत जास्त मिळाले. आता ते कुठून मिळाले याचा शोध घ्यावा लागेल.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!