Share

Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

Rishabh Pant | चट्टोग्राम :आज बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN 1st Test) पहिला कसोटी सामन जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. केएल राहुल (KL Rahul) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhabrey) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ऋषभ पंत (Rishabh Pant) बाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी यादरम्यान सांगितले की, संघ व्यवस्थापन पंतला कुठलीही गोष्ट करण्याचा सल्ला देत नाही.

या पत्रकार परिषदेदरम्यान पारस म्हांब्रे म्हणाले की, “ऋषभ पंतला संघ व्यवस्थापन आपली नैसर्गिक आक्रमक खेळी बदलण्याचा सल्ला देणार नाही. त्याला संघामध्ये आपली भूमिका आणि त्याच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षांची जाणीव आहे. ऋषभ पंतने 31 सामन्यांमध्ये 5 कसोटी शतक आणि 10 अर्धशतक केलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या संघांविरुद्ध पंतने त्याच्या फलंदाजीने चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पंत नेटवर आक्रमक फलंदाजी करताना दिसला आहे.”

पारस म्हांब्रे पुढे बोलताना म्हणाले की,”आम्ही पंतसोबत त्याच्या खेळीबद्दल कुठल्याही प्रकारची विशेष चर्चा केली नाही. कारण ती त्याची खेळण्याची पद्धत आहे आणि ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. तो कशाप्रकारे खेळतो याबद्दल आम्ही कधीच बोलत नाही. कारण संघाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, याची त्याला जाणीव आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण पारस म्हांब्रे गोलंदाजाबद्दल बोलताना म्हणाले की,”भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) वेगवान गोलंदाजीने आक्रमक नेतृत्व करणार आहे. उमेश हा एक अनुभवी गोलंदाज आहे. तो कधी काय करू शकतो याबद्दल सर्वांनाच माहित आहे. दुर्दैवाने उमेश यादवला आत्तापर्यंत जास्त संधी मिळाली नाही. कारण भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खेळत होते.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cricket Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या