🕒 1 min read
Breaking News | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. शिंदे आणि फडणवीस हे उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काल गुजरातला गेले होते.
या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नव्हती.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
- Rajesh Tope | पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, राजेश टोपेंचा राज्य सरकारला इशारा
- Ajit Pawar | शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली, अजित पवारांनी दिली माहिती
- Pravin Darekar | आरोप करण्याशिवाय विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही – प्रविण दरेकर
- Chandrashekhar Bawankule | चुकले असतील तर लोकशाहीमध्ये कायदे, पण शाईफेक मान्य नाही – चंद्रशेखर बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
