Share

Devendra Fadanvis | “सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार…”, सुळेंबाबत केलेल्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadanvis | मुंबई : अब्दुल सत्तांरांनी राष्ट्रवादी (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरुन आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला होता. तर अनेक लोकांच्या नजरा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया कडे होत्या. अशातच त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी, कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये, ते अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. मला असं वाटतं की राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. अब्दुल सत्तार बोलले त्याचे समर्थन मी करणार नाही ते चूकच आहे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे. राजकारणाची पातळी खाली चालली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी अशी आग्रही मागणी केली जाऊ लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाराज झाले आहेत. त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.

दरम्यान, मी देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर असतो तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोर गेलो असतो. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणुकांना समोर जाणार का? असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे. यादरम्यान, हे घटनाबाह्य कृषी मंत्री आक्षेपार्ह विधान करतात. असलं घाणेरडे मी सांगू पण शकणार नाही. असे घाणेरडे बोलणारे कृषिमंत्री तुम्हाला हवेत का ? असे लोक तुम्हाला पक्षात हवेत का, असे सवाल आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!