🕒 1 min read
Chandrakant Khaire | औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाची तोडफोड केली. तसेच अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड, औरंगाबाद येथील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. एवढेच नाही तर पुणे, ठाण्यासह अनेक शहरांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघात केला आहे.
अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही. तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्व कसं काय सहन करतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही असेही खैरे म्हणाले.
काय म्हणाले अब्दुल सत्तार –
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असे सत्तार म्हटले.
सत्तार पुढे म्हणाले, “भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Bharat Jodo Yatra | काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा भारत जोडो यात्रेत निधन
- Car Special Discount Offer | ‘या’ कारवर मिळत आहे बंपर ऑफर, तुम्ही पण घ्या संधीचा फायदा
- Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का? ; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण
- iPhone 14 Price | iPhone 14 मिळत आहे 7 हजार रुपयांनी स्वस्त, कसा? ते जाणून घ्या!
- Amol Mitkari | “… म्हणून अब्दुल सत्तारांनी कुत्रा ‘ही’ निशाणी मागितली होती”, अमोल मिटकरी सत्तारांवर कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
