Share

T20 World Cup | भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये पाऊस आला, तर कोणाला मिळणार फायनल मध्ये एन्ट्री?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) टी 20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) आता शेवटच्या टप्प्याकडे वळली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी (Semi final) मध्ये खेळणाऱ्या चार संघांची नावे देखील निश्चित झाली आहे. भारत (India), पाकिस्तान (Pakisthan), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (Newzealand) या संघांनी अंतिम चार मध्ये स्नान मिळवले असून यांच्यामध्ये उपांत्य स्पर्धा पार पडणार आहे. टी2 0 विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीमध्ये न्युझीलँड आणि पाकिस्तान आमने-सामने येथील तर दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये भारत आणि इंग्लंड समोरासमोर येणार आहेत. तर, या टी 20 विश्वचषकाच्या रोमांच्या सोबतच पावसाची चिंता वाढली आहे. कारण यावर्षी पावसामुळे अनेक सामान्यांवर परिणाम झाला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड या होणाऱ्या सामन्याची भारतीय संघाच्या चाहत्यांना खूप काळजी वाटत आहे. कारण या सामन्यादरम्यान पावसाने धुमाकूळ घातला तर आयसीसी काय निर्णय घेईल, असा प्रश्न सर्व भारतीय चाहत्यांसमोर निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आयसीसीने या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे जर सामान्य रद्द झाला तर राखीव दिवशी सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, दोन्ही दिवस पाऊस पडला तर काय होईल हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अशी परिस्थिती आलीच तर भारतीय चाहत्यांना आयसीसीच्या नियमानुसार आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण उपांत्य फेरीच्या दोन्ही दिवशी पाऊस पडला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल असा नियम आहे. कारण भारतीय संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. तर, दुसरीकडे इंग्लंड संघ आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे अंतिम फेरीमध्ये भारताला प्रवेश मिळेल.

तर दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना दरम्यान पाऊस पडला तर न्यूझीलंड संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल. कारण न्यूझीलंड संघ गटाच्या अवस्था आणि असून पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!