🕒 1 min read
Jayant Patil | मुंबई : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. याबाबत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वक्तव्य केलं आहे.
सुळे यांच्या कुटुंबातील आमदार रोहित पवार, सदानंद सुळे, स्वत: सुप्रिया सुळे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली परंतु याबाबत विरोधी पक्षनेते आणि सुप्रिया सुळे यांचे भाऊ अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत.
अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नका असंही यावेळी जयंत पाटील म्हणालेत.
मुंबईतील सत्तार यांच्या शासकीय बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली घराच्या काचा फोडल्या. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | “अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस” ; चंद्रकांत खैरेंचा घणाघात
- Abdul Sattar । “अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा”; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार टीका
- Bharat Jodo Yatra | काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांचा भारत जोडो यात्रेत निधन
- Car Special Discount Offer | ‘या’ कारवर मिळत आहे बंपर ऑफर, तुम्ही पण घ्या संधीचा फायदा
- Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का? ; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
