Share

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांची स्पष्ट भूमिका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज अख्या राज्याचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केलेली चालणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये देखील अनेक ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासासोबत कोणताही छळ केलेला चालणार नाही, अशा टीका तमाम शिवभक्तांकडून या चित्रपटावर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाची शो बंद पाडले जात आहे. कारण या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याचे आरोप केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात कार्यकर्त्यांसह जाऊन शो बंद पाडले. या टीकांना उत्तर देण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना दिग्दर्शक अभिषेक देशपांडे म्हणाले की, “आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून कोणताही चुकीचा इतिहास दाखवत नाही आहोत. तर, हर हर महादेव या चित्रपटाला सेन्सर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाल्यावरच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. आमच्याकडे चित्रपटाशी निगडित सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ आहे असे देखील ते म्हणाले. CBFC च्या पॅनल मध्ये अनेक इतिहास तज्ञ देखील असतात त्यांनी सगळे तपशील बघूनच या चित्रपटाला मान्यता दिली आहे. हर हर महादेव चित्रपटांमध्ये जर चुकीचा इतिहास असता तर या पॅनल कडून चित्रपटाला मान्यता मिळाली नसती. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे.”

तर दुसरीकडे ठाण्यामध्ये विवियाना मॉल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद करण्यात आला. या घटनेवर अभिजीत देशपांडे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांवर चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर त्यांचे कपडे देखील काढण्यात आलेले आहे. दरम्यान, अनेक प्रेक्षकांवर शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. एकीकडे आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे भक्त म्हणतो आणि दुसरीकडे त्यांचे विचार न समजून घेता शिवीगाळ आणि मारहाण करतो.” असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!