Share

Supriya Sule | “…हे देवालाच ज्ञात”; सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

सांगली :  आपल्याला माहिती आहे की, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. यावरून महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, सध्या सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी  जाहीर करण्यात आली. त्यावरूनही विरोधक शिंदे-फडणवीस सरकार वर निशाणा साधत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

काही मंत्री अद्याप आपल्या विभागातही गेलेले नाहीत. मंत्रालयात गेले तर मंत्री भेटत नाहीत. प्रशासन नेमकं कोण चालवते हे देवालाच ज्ञात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. कुंडल याठिकाणी क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त निराधार कुटुंबांना मदत आणि आशा सेविकांना सायकल वाटप आणि नाना-नानी पार्कचे उद्घाटन सोहळा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कर्यक्रम झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, हे सरकार ओरबाडून आणलेले आहे. यातून चांगले काहीही निष्पन्न झालेले नाही. अनेक नेत्याकडून राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी वक्तव्ये केली जात आहेत.

यामध्ये सामान्य माणूस भरडला जात आहे. अनेक मंत्री अद्याप त्यांच्या विभागातही गेलेले नाहीत. कामासाठी मंत्रालयात गेले तर मंत्रीच भेटत नाहीत अशी स्थिती आहे. या ओरबाडून सत्तेवर आलेल्या सरकारमुळे सामान्य माणूस भरडला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!