🕒 1 min read
मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हिंदू धर्मा विरोधात वक्तव्य केल्याबाबत त्यांच्या व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यावरुन भुजबळांनी व्यक्तीला धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यासह आणखीन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल :
चेंबूर येथील एका रहिवाशाला व्हिडीओ शेअर केल्याबाबत मारण्याची धमकी भुजबळांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. चेंबूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ :
दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Kangana Ranaut | कंगणाची राजकारणात एन्ट्री! एकनाथ शिंदेंची घेणार भेट
- Chandrakant Khaire | दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरून चंद्रकांत खैरेंचे शिंदे गटावर आरोप, म्हणाले…
- Ajit Pawar | डायनासॉर म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना अजित पवारांचे प्रत्युत्तर म्हणाले…
- Abdul Sattar | “माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य
- Ajay Devgn । अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
