मुंबई : शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो, असं म्हटलं जातं. अशाच न्यायाने प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा रणावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा कंगणाचा वाद सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नाका खाली टिचुन कंगणा ही भेट घेत असल्याचं म्हटलं जातं आहे.
कंगणा रणावत अन् उद्धव ठाकरे यांचा वाद
पालघर साधू हत्याकांडानंतर कंगणाने ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. एवढंच नाही तर तिने मुंबईची तुलना अप्रत्यक्षपणे POKशी केली होती. त्यानंतर कंगणाचा मुंबई येथील बंगला अनधिकृत आहे असं अचानक मुंबई महापालिकेला लक्षात आलं आणि तिच्या बंगल्याच्या अनधिकृत भागावर बुलडोझर चालवण्यात आला.
यादरम्यान, बंगला पाडण्यावरुन संतप्त कंगणाने ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. आज माझं घर तुटलंय उद्या तुमचा अहंकार तुटेल असं कंगणाने म्हटलं होतं. त्यानंतर काहीकाळ हा वाद थांबला होता. मात्र, हा वाद आता परत उफाळून येण्याची शक्यता आहे.
कंगणा भेटणार एकनाथ शिंदे यांनाः
शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी कंगणा आणि शिंदे यांची भेट होणार आहे. कंगणाला मुंबईमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यापर्यंत कंगणा-ठाकरे वाद पेटला होता. मात्र, आता शिंदे-ठाकरे वेगळे झाले असून शिंदेंमुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरून चंद्रकांत खैरेंचे शिंदे गटावर आरोप, म्हणाले…
- Ajit Pawar | डायनासॉर म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना अजित पवारांचे प्रत्युत्तर म्हणाले…
- Abdul Sattar | “माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, कारण…”; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य
- Ajay Devgn । अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
- Pune | मर्सिडिजच्या सीईओची कार पुण्याच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकली, गाडी सोडून ऑटो रिक्षाने केला प्रवास


