Share

Chandrakant Khaire | दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरून चंद्रकांत खैरेंचे शिंदे गटावर आरोप, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात निवडणूकांचं वारं घुमू लागलं असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळ्यावरून (Dasara Melava)  वेगळीच चढाओढ सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मेळावा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं दिसून येतं आहे. अशातच ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

काय म्हणारे चंद्रकांत खैरे ?

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून राज्यात पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्याला शिंदे गटाकडून एक कोटी रूपये देण्यात येत आहेत. एवढंच नाहीतर मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला ट्रॅव्हल्स, एसटी, रेल्वेने तर आणण्यात येणार असून, त्यांना खर्चासाठी प्रत्येकी 500 रुपयेही देण्यात येणार आहे.

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर केलेल्या आरोपांवर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!