Share

Ajit Pawar | डायनासॉर म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना अजित पवारांचे प्रत्युत्तर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दोन दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर हल्ला केला होता.

काय म्हणाले अजित पवार ?

सत्तारांच्या याच वक्तव्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पलटवार केला असल्याचं समजतं आहे.

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच, अब्दुल सत्तारांच्या टीकेला राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना वेगळं बोलत होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले तेव्हा वेगळं बोलायचे.

ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही.त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!