🕒 1 min read
मुंबई : न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) प्रकरणी रणवीर सिंग ने मोठा खुलासा केला आहे. 29 ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात आपली बाजू मांडळी होती. यावेळी त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्या दरम्यान रणवीरने पोलिसांना सांगितले की, त्याच्या फोटोशूटच्या फोटो सोबत छेडछाड करण्यात आली आहे. रणवीरने सांगितले की, त्याच्या एका फोटोत बदल करण्यात आला असून तो वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
रणवीरचे बयाण नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचाही तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या फोटो सोबत खरोखरच छेडछाड झाली आहे का आणि जर केली असेल तर ती कोणी केली?
फोटोशूट प्रकरणी नक्की काय घडले
रणवीरने 22 जुलै 2022 रोजी पेपर मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. रणवीरचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आणि खुद्द अभिनेत्यानेही त्याचे न्यूड फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. काही फोटोंमध्ये तो ब्रीफ तर काहींमध्ये तो न्यूड होता. हे फोटो व्हायरल होताच या प्रकरणाने पेट घेतला आणि अनेकांनी अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल केला. तक्रारकर्त्यांमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) पदाधिकारी आणि महिला वकिलाचा समावेश आहे.
न्यूड फोटोशूटच्या तक्रारीमुळे रणवीरने 29 ऑगस्टला सकाळी आपले बयाण नोंदवले होते. पोलिसांनी त्याची सुमारे अडीच तास चौकशी केली.
रणवीरने पोलिसांना असेही सांगितले होते की, त्याच्या अशा फोटोशूटमुळे लोकांना त्रास होऊ शकतो याची त्याला कल्पना नव्हती, त्याने ते सामान्य फोटोशूटप्रमाणे घेतले. मात्र त्यावरून एवढा मोठा वाद निर्माण झाला होता. लोकांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता असेही रणवीरने सांगितले होते.
पोलिसांनी रणवीर सिंगला एकूण दहा प्रश्न विचारले होते, ज्यात शूटिंग कोणत्या कंपनीसाठी करण्यात आले होते, ते कोणी केले होते आणि कंपनीसोबतचा करार आदींचीही माहिती घेण्यात आली होती. रणवीरने पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | “त्या कंपनीला महाराष्ट्रातील सत्तांतराची कल्पना कशी असेल”, नरेंद्र मेदींचा एकनाथ शिंदेंना दिलासा
- UPSC Recruitment 2022 : UPSC ची उपसंचालकांसह अनेक पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध! जाणून घ्या…
- Hair Fall Reason | तणावामुळे केस गळतात का? कितपत खरे आहे ते? जाणून घेऊया!
- Devendra Fadnavis | अनिल अग्रवालांची ‘ती’ पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला
- Anil Agrawal | “गुजरातची निवड केली असली तरी जुलैमध्ये…”, वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचं ट्विट
- Devendra Fadnavis | अनिल अग्रवाल यांच्या ‘त्या’ घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
