🕒 1 min read
जालना : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलंय. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी झालेली पाहायला मिळत आहेत. अशातच आज राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावरून शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्ला केला आहे.
अंबादास दानवे यांचे वक्तव्य-
सुप्रीम कोर्टात आज सर न्यायाधीशांनी शिंदे गटालाच ‘हू आर यू?’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आता त्यांना हे उत्तर द्यावं लागेल. त्यानंतरच सर्व प्रश्नांचा निकाल लागेल, असा टोला अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. आज अंबादास दानवे जानलामध्ये असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे गटाने शिवसेना पक्षातून बाहेर पडल्याचं अजूनही मान्य केलेलं नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत पण पक्षाचं नेतृत्व आम्हाला मान्य नसल्याची भूमिका त्यांनी कोर्टासमोर मांडली आहे. शिवसेना सोडली नसल्याने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदी आम्हाला लागू होत नसल्याचा दावाही शिंदे गट करत आहे. परंतू आज सरन्यायाधीशांनी तुम्ही कोण आहात?, असा सवाल शिंदे गटालाच केला आहे.
दरम्यान, आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसून, येत्या 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
- Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया
- Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”
- Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
