Share

Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षाचं चिन्हं कोणाला मिळणार याचा आज निर्णय होणार होता. मात्र, आजही या प्रकरणाची सुनावणी झाली नसून सुनाणवी लांबवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून तात्काळ सुनावणी होण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावरुन आज घटनापीठ मध्ये सुनावणी करण्यात येणार होती. या प्रकरणावर शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीयाः

आम्ही विचारांचे वारसदार आहोत, ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वारसदार जरूर असतील, मात्र, आम्ही वैचारिक वारसादार आहोत, चिन्हं रुजवायला वेळ जाईल पण आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

चिन्हं आम्हालाच मिळेल, बहुमतातील शिवसेना आमच्याकडे असून आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंचाचं बहुमत आमच्याकडे असल्याचं देसाई म्हणाले. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्हं मिळेल अशी आशा देसाईंनी व्यक्त केली आहे.

धनुष्यबाण आमचाच आहेः

चिन्हं नाही मिळालं तरी सर्व बाजूने आमची तयारी आहे, ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे, आमचं स्वागत हजारो लोकांनी केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात, शिंदे जातात तिथं मोठ्या प्रमाणात लोक येतात, आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत असतात, असं म्हणत धनुष्यबाण आमचाच असल्याचं शंबुराज देसाई यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!