🕒 1 min read
बारामती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीतूनच विसर्जन केले, तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे .यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला लगावला होता. अशातच राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य-
बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला केला आहे. यासंदर्भात आव्हाडांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक ट्विट केलं आहे.
तरीही जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही-
1990 साला नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नसल्याचंं आव्हाड यांनी सांगितलं.
तसेच, आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | दसरा मेळावाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Shivsena | शिवसेना – शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
- Ravi Narayan | मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक!
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आव्हान, म्हणाले…
- Uddhav Thackeray | अमित शहांच्या ‘जमीन दाखवण्याची वेळ आलीय’ टीकेवर उद्धव ठाकरे म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
