🕒 1 min read
पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षनेते आणि विरधी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगत चालली आहे. त्यामध्ये सगळीकडे निवडणुकांचं वार घुमू लागलं आहे. आगमी निवडणुकांसाठी राज्यातील सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच भाजप पक्षाचं यावेळेसच टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विशेष करून बारामती असल्याचं बोललं जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य-
आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलाच टोला लागवला आहे. आज देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एक कर्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला ते उपस्थित होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भाजपचं सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे आणि महाराष्ट्रात बारामतीचा समावेश होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, आमचा जो रामोशी समाज आहे, त्याचं मोठं योगदान राहिलेलं आहे. परंतू काही कारणामुळे त्याकडे दुलर्क्ष झालं पाहिजे तेवढं आपण या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पुढे ते असंही म्हणाले की, आता आमचं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे. हे सरकार या समाजाकरिता नव्याने विविध योजना घेऊन येईल.
पत्रकारांकडून फडणवीसांना विचारण्यात आले की, शिंदे गटाकडून चिंन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, मला अशा कोणत्याही मागणी बद्दल माहित नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”
- Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
- Deepak Kesarkar | दसरा मेळावाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Shivsena | शिवसेना – शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
