Share

Gulabrao Patil | ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. या वक्तव्यावरून पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही. हातपाय बघणारे कधीच स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही असं वक्तव्य पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये केलेले आहे. या वक्तव्य वरून शिवसेनेच्या वतीने सोमवारी जळगाव महापालिकेसमोर पाटील यांचे प्रतिमा जाळण्यात आले तसेच प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

 

मात्र माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याच स्पष्टीकरण पाटील यांनी दिला आहे. आंदोलन कारण हास्यास्पद आहे. चुकीचा अर्थ काढून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आल्याचं मंत्री पाटील म्हणाले. तसेच याबाबत ज्या वृत्त वाहिनीने प्रसारित केले, त्या वृत्त वाहिनीवर हक्क भंग केल्या. बाबतचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचं पाटील यांनी बोलताना सांगितलं. मी कोणत्या डॉक्टर बाबत बोललो नाही. वृत्त वहिनीने तपासून बातम्या केल्या पाहिजेत जेणेकरून कोणाचे करिअर बरबाद होणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. आज एका कार्यक्रमात पाटील यांनी आम्ही 50 खोके एकदम ओके आहोत. असं वक्तव्य केलं होत. सर्व बाजूने आमच्यावर टीका होत आहे. आमच्या बदनाम्या करण्यात येत आहे. तसेच संजय राऊत यांच्या वेळी आम्ही मतदान केलं होत तर त्यावेळी आम्ही पैसे घेतले होते का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!