🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात आहे. या सरकार नंतर सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महानगरपालिकेचं वेध लागलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांना आधीच भाजप आणि मानसे यांची युती होणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा खोटी असल्याचं दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वाक्यामुळे ही चर्चा रंगू लागली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
राज ठाकरे आमच्या मोठ्या भावासारखेः चंद्रशेखर बावनकुळे
आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ही भेट कौटुंबिक होती असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. मी फक्त राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो, याचा राजकीय अर्थ काढू नये, ते आमच्या मोठ्या भावासारखे आहेत, राज ठाकरेंनी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात नेहमीच हजेरी लावली असून त्या दृष्टीने ही एक भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनसे भाजप युती संदर्भात निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील. केंद्रात अमित शहाजी, राज्यात देवेंद्र फडणवीस, मी केवळ अध्यक्ष म्हणून भाजप कसा वाढेल हीच माझी जबाबदारी आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Khadse | “भाजप-मनसे एकत्र आल्यास…” ; एकनाथ खडसेंची मोठी प्रतिक्रिया!
- Raosaheb Danve | पुढील अडीच वर्षात काय होईल सांगता येत नाही – रावसाहेब दानवे
- NCP | “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार…” ; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
- Ganpati Visarjan | पुण्यात गणेशोत्सवाच्या आधीच विसर्जन मिरवणुकीवरून वाद! प्रकरण थेट न्यायालयात
- Vidya Chavan : “मोहित कंबोज हा ठग, भाजपचा फायनान्सर” ; विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
