🕒 1 min read
मुंबई : भाजप आणि मनसे एकत्र आल्यास नवल नाही. आताच्या आणि पूर्वीच्या भाजपमध्ये फरक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले. भाजप आणि मनसे नेत्यांच्या चांगल्याच गाठीभेटी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युती होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला टोला लगावला आहे. पूर्वीच्या भाजपमध्ये आणि आताच्या भाजपमध्ये फरक आहे. या राज्याच भविष्यात काहीही होऊ शकते. पहाटेच्या वेळेस अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतली असं कधी वाटलं नव्हत पण ते झालं. तसेच एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील असेही वाटले नव्हते पण ते घडले. त्यामुळे अशा परिस्थित भाजप-मनसे एकत्र आले तर आश्चर्य वाटून घेऊ नये.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेट-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात काल बैठक झाली होती. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासभर चालली होती. तर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी-
यापूर्वी महिनाभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात केल्याचे मानले जात आहे.
दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक महत्त्वाची का मानली जाते?-
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बीएमसी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. प्रदीर्घ काळापासून बीएमसीच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेला हटवण्यासाठी भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार…” ; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
- Ganpati Visarjan | पुण्यात गणेशोत्सवाच्या आधीच विसर्जन मिरवणुकीवरून वाद! प्रकरण थेट न्यायालयात
- Vidya Chavan : “मोहित कंबोज हा ठग, भाजपचा फायनान्सर” ; विद्या चव्हाणांचा गंभीर आरोप
- Eknath Shinde | “संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार एकत्र आलं, आता…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण
- Sharad Pawar | “माझं बोट धरुन राजकारण शिकलेली व्यक्ती देशासाठी..”, शरद पवारांचा नरेंद्र मोंदींवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
