🕒 1 min read
अमरावती : बडनेराचे अपक्ष आमदार रवि राणा आणि उद्धव ठाकरे नंतर आता अमरावतीत राणादांपत्यांचा बच्चू कडू विषयी आक्षेपार्य विधान पुढे आले आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दहीहंडी कार्यक्रम आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूवर सडकून टीका केली. मी गुहाटीला जाणारा आमदार नाही, याशिवाय ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया हे विधान देखील करीत बच्चू कडू वर अप्रत्यक्षरीत्या आमदार रवि राणा यांनी टीका केली.
या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आहे. ‘अबे हरामखोराची औलाद…आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तुम्ही आता मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे,’ असं आमदार कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे, तर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. सत्ताधारी पक्षांना पाठिंबा असलेलेच दोन आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने भाजप-शिंदे गट युतीतही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde | सामान्यांचा रोजचा त्रास मुख्यमंत्र्यांनी काही वेळ भोगला! अन् घेतला ‘हा’ निर्णय
- Ambadas Danve |”मंत्री भुमरेंच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्यांची उपस्थिती”; अंबादास दानवेंचा टोला
- Kirit Somaiya | अनिल परब यांच रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकार खर्च करणार – किरीट सोमय्या
- Jitendra Awhad | “आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल तर… “; आव्हाडांचा इशारा
- India vs Pakistan | भारताने टॉस जिंकला! जाणून घ्या, भारताची प्लेइंग इलेव्हन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
