मुंबई : पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोजगार व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांची उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आला. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुकता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिले. यावरुन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे. सुरत, गुहावाटी, गोवा आणि मुंबई अशी देश भ्रमंती करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदार संघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती, अशा प्रकारे दानवे यांनी खोचक टीका केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. यावेळी ज्या ठिकाणी आमदार शिंदे गटात आले तिथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्ये ही आदित्य ठाकरे यांची जोरदार सभा झाली होती. सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी देखील जोरदार तयारी केली होती. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमली होती. मात्र भुमरे यांच्या कार्यक्रमालाकेवळ शंभर लोकांची गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यातील गर्दी आठवण आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | अनिल परब यांच रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकार खर्च करणार – किरीट सोमय्या
- Jitendra Awhad | “आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल तर… “; आव्हाडांचा इशारा
- India vs Pakistan | भारताने टॉस जिंकला! जाणून घ्या, भारताची प्लेइंग इलेव्हन!
- India vs Pakistan | पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली शतक ठोकणार? टीम इंडियाने आधीच केले अभिनंदन, जाणून घ्या…
- आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

