Share

CM Eknath Shinde | सामान्यांचा रोजचा त्रास मुख्यमंत्र्यांनी काही वेळ भोगला! अन् घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील ट्रॅफिक सामान्य नागरीकांसाठी काही नवीन नाही. राजकीय आळसापोटी सामान्य जनता ट्रॅफिकमध्ये रोज त्रास सहन करते. हाच त्रास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळी वेळ चुकून भोगला, त्यामुळे जो निर्णय आधी घ्यायचा होता, तो निर्णय त्यांनी स्वता त्रास भोगल्यावर घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल-

मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. श्री.शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते.

शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको’

आज मुंबईकडे परत जात असताना प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून नियोजनाची माहिती घेतली. नागरिकांना होणारा त्रास लवकर दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको’ हे त्यांचे वाक्य आणि आज दिलेली भेट नक्कीच जनतेला दिलासा देणारी आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!