🕒 1 min read
Sanjay Raut | नाशिक : संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी हेमंत गोडसे यांच्यावर निशाणा साधला. खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) हा शिवसेनेचा चेहरा कधीच नव्हता, असे ते म्हणाले.
मागच्या नाशिक लोकसभा निवडणूक दरम्यान किस्सा सांगत संजय राऊत यांनी गोडसेंची एंट्री कशामुळे झाली याचे कारण सांगितले. ते म्हणाले, त्यावेळी गोडसे यांना शिवसेनेतून प्रचंड विरोध होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातुन, तालुक्यातुन विरोध होता. मात्र तिकीट कापणे योग्य नव्हते, ते मातोश्रीवर आले, त्यांनी चुका दुरुस्त करू असे म्हणाले. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिले, तेव्हा पक्षाचा निर्णय होता, पक्षाचा निर्णय कधी लादला जात नाही, यावेळी पक्ष बसून निर्णय घेईल.
नाशिककर यावेळी चेहऱ्याला नाहीतर शिवसेनेला मतदान करतील, त्यामुळे इथं बसलेला कोणीही निवडणूक लढवू शकतो, आम्ही कशाला पाहिजे. मच्छराला मारायला आमची गरज नाही, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हेमंत गोडसे यांना लगावला. हेमंत गोडसेंना साधा शिवसैनिक सुद्धा हरवू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. आमचे सरकार आल्यावर बचू कडू आमच्या सोबत येतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. राज्यात असे काही नेते आहेत सरकार जिथे तिथे जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “आमचे सरकार आल्यावर बच्चू कडू आमच्या सोबत येतील”; संजय राऊतांची बोचरी टीका
- Bacchu Kadu | सभेतून बोलल्याने मत मिळत नाहीत ; बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका
- Ravi Rana | पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या बदलीवर रवी राणा यांची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | ‘फ्रॅक्चर फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द, अजित पवारांकडून सरकारवर घणाघात
- Sanjay Raut | “वारकरी संप्रदायाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलले नाहीत?”; संजय राऊतांचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
