Share

Eknath Shinde | आम्ही गद्दारी केली असती तर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले असते का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट घेतलं आहे, आम्ही गद्दारी केली असती तर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले असते का? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

 

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली नाही. शिवसेनेतून निवडून आलो आहोत. जनतेनं भाजप शिवसेना युतीला बहुमत दिलं होतं. बहुमत मिळाले तर कोणासोबत सरकार स्थापन करायचे होते, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेईमानी कोणी केली?, छगन भुजबळ आमचे लीडर होते त्यांना आमची भूमिका पटली असेल’ ‘जर आम्ही बेईमानी केली असे म्हणता मग आम्ही गेलो की रस्त्यावर गर्दी कशी होते? लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. लोकांनी आमची भूमिका अमान्य केली असती. आज माझा उल्लेख केला कंत्राटी मुख्यमंत्री केला गेला, हो आहे मी कंत्राटी मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या विकासाचे मी कंत्राट घेतले आहे. जनतेचे अश्रु पुसण्याचे मी कंत्राट घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे मी कंत्राट घेतले आहे, असंघाशी संघ करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री बरा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!