Share

Nitesh Rane | “चपट्या पायांचे उद्धव ठाकरे यांच्यामुळे…”, नितेश राणे यांची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी विधानभवनात मुंबई गोवा रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज कोकणपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर सडकून टीका केली.

नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीकाः

कदाचित भास्कर जाधव विसरले असतील की आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांना जरा आठवण करून देण्याची गरज आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आहेत. त्यांना जे वाटत होतं ती भीती त्यांना उद्धव ठाकरे असताना असायची कारण तो भीती देणारा माणूसच होता, चपट्या पायांचा माणूस केल्यामुळे सगळ्यांचा, असा प्रकार झालाय, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओः

मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी पुढील दोन दिवस लोकप्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. तसेच बांधकाम मंत्री रावींद्र चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून 25 तारखेपर्यंत सगळे खड्डे बुजावेत असा आदेश देण्यात आला आहे. जेवढ्या एजन्सी नेमायचे ते नेमा, असे आदेश दिले होते. ते स्वतः दौरा करणार होते, आम्हीही तिथे जाणार आहोत, चांगला मित्र मिळाला आहे. मुंबईगोव्यावर जी विघ्न अशी चर्चा होती ती कायम बंद होईल, असं मला वाटत असल्याचं नितेश यांनी म्हटलं आहे.

राणेंचं अश्वासनः

दर्मायन, मागे महाविकास आघाडी सरकारने रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सना पैसे दिले नव्हते, असा आरोप नितेश आणि यांनी केला. मात्र एकनाथ शिंदे सरकार कॉन्ट्रॅक्टर असो अथवा रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच कोणालाही त्रास होणार नसल्याचं आश्वासन नितेश राणे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!