🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. अशातच काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की देखील झाली असल्याचं पाहायला मिळालं. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक वारंवार एकमेकांवर टीका करत असताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
मनिषा कायंदे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोलः
आठ वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्यावर तुम्हाला काय मिळालं असा सवाल मनिषा यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीचं दिल्लीचं कार्यालय केवळ ग्राउंड फ्लोअर होतं मात्र ते आता किती मजली झाले, असं आम्ही ऐकतो की 600 कोटींचं कार्यालय बांधलेलं आहे. तिकडे ते जाऊ शकतात, तरी देखील अशी काहीतरी मंत्रीपद त्यांना मिळाली आहे. मग सांगा की मातोश्रीवर एकदा गेल्यावर तुम्हाला काय मिळालं आणि आठ वेळा दिल्लीच्या वाऱ्या केल्यावर तुम्हाला काय मिळालं, असा सवाल मनीषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.
पाहा व्हिडीओः
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. एवढंच नाही तर सत्तेत आल्यानंतर शिंदे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावरुन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धारेवर धरत आहेत.
महत्वाच्या बातम्याः
- Nitesh Rane | “चपट्या पायांचे उद्धव ठाकरे यांच्यामुळे…”, नितेश राणे यांची बोचरी टीका
- Assembly Session 2022 | आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर प्रचंड गदारोळ ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले
- Uddhav Thackeray | शिंदे सरकारचा जन्मच खोक्यातून झालाय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray | महाराष्ट्रात मोदींचं नाही बाळासाहेबांचं नाव चालतं – उद्धव ठाकरे
- The Kapil Sharma Show | सर्वांना हसवणारा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘या’ तारखेपासून होणार सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
