🕒 1 min read
मुंबई : राज्यात रोज नव नवीन घडामोडी सुद्धा घडत आहेत. पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. या पूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवना बाहेरविरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणा देत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी सुद्धा अंबादास दानवे यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पुन्हा एकदा विरोधकांवर हल्ला बोल केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवता आणि शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला परवानगी देत नसल्याची टीका आता शिंदे-फडणवीस सरकारवरविरोधी पक्षाकडून केली जात आहे. अशातच आता शिंदे गटाचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला. ‘शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, अशा घटनेचा विषय जर हे सरकार विसरत असेल तर मग हे कुठलं हिंदुत्वाचं सरकार, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेचे राज्यातील काही महत्वाचे आमदार सुद्धा त्यांच्या सोबत शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेना मात्र खिंडार पडले. काही आमदार गेले म्हणून शिवसेना गेलेली नाही. शिवसेना आणि शिवसैनिक जागेवर आहे. त्याचबरोबर जनतेचा पाठिंबा सुद्धा शिवसेनेच्या मागे पूर्वीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शिवसेनाच सर्वांच्या नाका-तोंडात पाणी घालेल” असा खोचक टोला सुद्धा दानवे यांनी विरोधकांना लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | “५० खोके, ५० खोके, खावून, खावून माजले बोके” ; विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
- Rakesh Tikait | भाजप यांचं फोडाफोडीचा राजकारण रोखण्यासाठी आता… तुमचा देखील उद्धव ठाकरे होईल, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल
- Sapna Chaudhary | सपना चौधरी अडचणीत, न्यायालाकडून अटक वाॅरंट
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, आता ‘या’ आमदाराने पुकारलं बंड
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिल्या ‘या’ विशेष सूचना, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
