Share

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिल्या ‘या’ विशेष सूचना, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती. सुरू होणारी महाप्रबोधन यात्रा, सुप्रीम कोर्टाचा निकाल, पावसाळी अधिवेशन आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या सूचनाः

विधानसभेत विविध विकास कामांचे प्रश्न लावून धरा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना केली आहे. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, बिलास पोतनीस, प्रकाश फार्तपेकर, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, रवींद्र वायकर, विधानसभा आणि परिषदेचे आमदार बैठकीला उपस्थित होते.

सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडाः

संघटनात्मक पक्ष वाढीसाठी सगळ्यांनी एकत्र काम करा. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडा, केलेली काम लोकांपर्यंत घेऊन जा, गणेशोत्सवानंतर मी राज्याचा दौरा करणार आहे, कमी दिवसाचं जरी अधिवेशन असलं तरी सभागृहात मुद्दे लावून धरा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्या आहेत. दरम्यान बैठकीनंतर आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सचिन अहिर यांनी दिली माहितीः

यादरम्यान, अहिर यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सुप्रीम कोर्टात तारखा पुढे ढकलत आहेत, यावर चर्चा झाली असून महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे त्यावर देखील चर्चा झाली असल्याचं अहिर यांनी सांगितलं आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी बाबत संदर्भात चर्चा झाली आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचं अहिर म्हणाले. उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता असं म्हणत शेतकऱ्यांकरता कष्ट करणाऱ्यांकरीता हे सरकार काय निर्णय घेत आहे?, असा सवाल अहिर यांनी केला.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!