🕒 1 min read
लखनऊ : लखनऊ मधील एका न्यायालयाने सोमवारी प्रसिद्ध नृत्यांगना तसेच अभिनेत्री सपना चौधरीविरुद्ध डान्स शो रद्द केल्याबद्दल आणि तिकीटधारकांना पैसे परत न केल्याबद्दल अटक वाॅरंट जारी केलं आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी पुढील सुनावणीची तारीख ३० सप्टेंबर निश्चित केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्येही याच कोर्टाने तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर सपना चौधरी कोर्टात हजर झाली आणि तिला जामीन मिळाला.
सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट :
या प्रकरणी सपना चौधरी सोमवारी सुनावणीसाठी हजर राहणार होती, मात्र चौधरी न्यायालयात हजर झाली नाही. एवढंच नाही तर तिच्या वतीने कोणताही अर्ज करण्यात आला नाही. त्यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेत सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणी उपनिरीक्षक फिरोज खान यांनी 14 ऑक्टोबर 2018 रोजी शहरातील आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्याः
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, आता ‘या’ आमदाराने पुकारलं बंड
- Uddhav Thackrey | उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना दिल्या ‘या’ विशेष सूचना, जाणून घ्या
- Karuna Sharma । “मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातंय”; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
- Sachin Ahir | मातोश्रीवर झालेल्या बैठकीची सचिन अहिर यांनी दिली माहिती, ‘या’ विषयांवर झाली चर्चा
- Shivsena | जे वाजपेयी आणि आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकारणार?, शिवसेनेचा भाजपाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
