Share

Arvind sawant | “ही हळद उतरली की तुमची नशाही उतरेल”; अरविंद सावंतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या तीन गट एकमेकांवर टीकास्त्र डागत आहेत. हे तीन गट म्हणजेच शिवसेना, भाजप आणि शिंदे गट. आजही भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले. मात्र अजूनही हा वाद शांत झालेला नाही. सावंतांच्या प्रत्युत्तरानंतरही सातपुते यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केले. त्यावरून आता अरविंद सावंत यांनी सातपुतेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“आपण लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे आपण आपल्या भाषेची मर्यादा पाळलीच पाहिजे. पण भाजप नेते सातत्याने अहंकार, चीड घाणेरड्या पद्धतीने व्यक्त होत आहे. अहो, तुमच्याचकडे नितीन गडकरीजी आहेत, त्यांच्याकडे जरा बघा. तेव्हाच तुम्हाला कळेल कि तुम्ही कसं वागायला हवं. ही चार दिवसाची हळद आहे, ती उतरली की तुमची नशा देखील उतरेल.”, असा इशारा सावंत यांनी राम सातपुतेंना दिला आहे. तर सातपुतेंच्या पहिल्या ट्विटवर सावंत म्हणाले होते कि, “कोण हे राम सातपुते. भाजपचे आमदार का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार. देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर कारवाई करून दाखवा, नाहीतर रामराज्याची भाषा करू नका.”

काय म्हणाले सातपुते?

आमदार राम सातपुते यांनी आज शिवसेना आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले कि, “आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा. उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा.” त्यावर अरविंद सावंत यांनी सातपुतेंच्या संस्कारांवर भाष्य केले. त्यामुळे पुन्हा सातपुते ट्विट करत म्हणाले कि, “आईचे दूध काढणे कितपत योग्य आहे ? एखाद्याच्या आईच्या दूधावर बोलण्यात कोणते संस्कार आहेत? निघाले संस्कार काढायला. सत्ता जाताच शिल्लक सेनेच्या लोकांना संस्कार आठवायला लागलेत. हेच संस्काराचे चार थेंब संजय राऊत यांना पाजले असते तर बर झालं असत. टीव्ही कॅमेऱ्यासमोर शिव्या देणाऱ्या संजय राऊत यांची शिकवणी घ्यायला सवड नव्हती का?

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!