🕒 1 min read
मुंबई : आज भाजपतर्फे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशिष शेलार यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. मुंबईकर ज्या आघाड्यांवर लढतो, त्या समस्यांना तोंड देणारा नेता भाजप श्रेष्ठींनी अध्यक्ष पदावर नियुक्त केलाय. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना आता झगडण्याची गरज नाही. मुंबईला बदल हवाय, एवढी वर्ष फसवणूक करणाऱ्या शिवसेनेपासून बदल हवाय, असं जाहीर वक्तव्य करत मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला.
आशिष शेलार यांना पद मिळण्याचं कारणः
भाजप श्रेष्ठींनी मला तिसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. हे पद मला नाही तर प्रत्येक आघाडीवर लढणाऱ्या सामान्य मुंबईकराला दिलंय, असं वक्तव्य शेलार यांनी केलं. तसेच पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनवलं नाही तर एका विचाराला, समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवलंय. सात रस्त्याच्या कुंभारचाळीत राहणाऱ्या व्यक्तीला, एका चाळकरीला अध्यक्ष केलंय. जो मुंबईत म्हाडाच्या संक्रमण शिबीरात स्वतःचं घर पुन्हा स्वप्नवत होईल की नाही, यासाठी झुंजणाऱ्या मुंबईकराला अध्यक्ष केलंय. आग्री कोळी, झोपडपट्टीत घराचं पुनर्विकासाचं स्वप्न पाहणाऱ्याला पद दिलं आहे.
मुंबईला कोण हवय, आशिष शेलार यांचा सवालः
आता मुंबईकरांना कोण हवंय, असा सवाल करत आशिष शेलार म्हणाले, ‘ आता मुंबईकरांना मालवणीच्या झोपडपट्टीत हिंदूंवर अन्यायाविरोधात संघर्ष करणारा मंगलप्रभात लोढा हवाय, मुंबईत कुर्ल्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वतःचं घर मिळण्यासाठी संघर्ष करणारा गोपाळशेट्टी हवाय, टोल नाक्यावरील भ्रष्टाचाराचा बिमोड करणारा मनोज कोटक हवाय, सोसायटी-चाळीचं घर विकसित करण्यासाठी संघर्ष करणारी पूनमताई महाजन हवी आहे, घरासाठी संघर्ष करणारा अतुल भातखळकर हवाय.
शिवसेनेवर टीकाः
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेलार यांनी या प्रसंगी शिवसेनेच्या महापालिकेतील कामावर जोरदार टीका केली. या भाषणात आशिष शेलारांनी शिवसेनेनं आतापर्यंत महापालिकेत फक्त भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला.
महत्वाच्या बातम्याः
- Rohit Pawar | महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठी गोविंदा आरक्षणाचा निर्णय; रोहित पवार
- Bilkis Rape Case|”बिलकीस बानू प्रकरणातील गुन्हेगार चांगल्या संस्काराचे आहेत”, ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक विधान
- Manish Sisodia । “भ्रष्टाचाराचा मुद्दाच नाही, अरविंद केजरीवाल ही मोदींची खरी अडचण, म्हणून मला…”; सिसोदियांचे थेट आरोप
- Mumbai Police | मुंबईत २६/११ची पुनरावृत्ती होण्याची धमकी! आयुक्तांची महत्वाची माहिती! म्हणाले, “पाकिस्तानातून…”
- “आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे…”, किशोर पाटील यांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
