Share

Bilkis Rape Case|”बिलकीस बानू प्रकरणातील गुन्हेगार चांगल्या संस्काराचे आहेत”, ‘या’ भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 2002 साली झालेल्या बिलकीस बानू बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना मुक्त करण्यात आलं आहे. माफ करणाऱ्या सरकारी समितीचा भाग असलेले भाजप आमदार सीके राऊलजी यांनी दोषींना पाठिंबा देत विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच धुमाकूळ उडाला आहे.

भाजप आमदार सीके राऊलजी यांचं बिलकीस बानू दोषींबाबतचं स्पष्टीकरण

गुजरात दंगलीतील काही दोषी हे चांगले संस्कार असलेले ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच धार्मिक तणावाच्या परिस्थितीत एका समाजाकडून दुसऱ्या समाजातील निरपराध लोकांना गवण्याचा प्रयत्न केला जातो, ते निर्दोष असू शकतात, असं देखील ते पुढे म्हणाले.

बिलकीस बानू प्रकरणः

पंधरा वर्षाहून अधिक काळ नंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग होता की नाही हे मला माहित नाही, असं राऊलजी म्हणाले. आम्हाला दोषींच्या वर्तनावर आधारित त्यांच्या मुदतपूर्व सुटकेचा निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे बिलकिस प्रकरण काय होतं, ते कोण होते, हे मला माहीत नव्हतं, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही निर्णय घेतला असल्याचं राऊलजी यांनी स्पष्ट केलं आहे.

दोषींच्या वागणुकीवरुन घेतला निर्णयः

तुरुंगात या दोषींची वर्तणूक चांगली असल्याचं सीके राऊलजी यांनी सांगितलं. एवढंच नाही तर जेलरला विचारल्यावर दोषींची वागणूक चांगली होती तसेच ते ब्राह्मण देखील होते आणि त्यांच्यावर चांगले संस्कार झाले असल्याचं आणि त्यांच्या कुटुंबाची वागणूक ही चांगली असल्याचं समोर आलं, असं राऊलजी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!