🕒 1 min read
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आज (शनिवार, २० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. काल रात्री ११.४५ वाजता मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात हा क्रमांक पाकिस्तानचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँच करत आहे.
मुंबईच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ- पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, “आम्ही महाराष्ट्र एटीएस आणि इतर एजन्सीच्या संपर्कात आहोत. मी मुंबईतील सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. अशी कोणतीही बाब आम्ही हलक्यात घेत नाही. मुंबईच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ. मुंबईचे रक्षण करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. तरीही दोन दिवसांपासून सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या इनपुटच्या आधारे आम्ही आवश्यक ती पावले उचलू”
हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजवली-
राज्यभरात मोठ्या जल्लोष दहीहंडी साजरी झाली. यानंतर आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. तसेच लगेचच नवरात्रौत्सव आणि मग दिवाळी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजवली आहे.
भारतातलेच लोक करणार मदत-
मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच 6 लोक मदत करणार असल्याचं देखील दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात मुंबईवर हल्याचं सावट आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे…”, किशोर पाटील यांचा हल्लाबोल
- Narendra Modi | बँकांचे खासगीकरण मोदी सरकार यांच्या अंगलट ; RBI ने दिला गंभीर इशारा!
- देवेंद्र पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले मला बघायला आवडेल – अमृता फडणवीस
- Crime News | मुंबईत 5 कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक, 2 कोटी रुपयांचे सोनेही जप्त
- Manish Sisodia । नरेंद्र मोदी मला येत्या दोन तीन दिवसात मला तुरुंगात टाकतील; मनीष सिसोदियांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
