Share

“आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे…”, किशोर पाटील यांचा हल्लाबोल

Published On: 

जळगाव : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौरामुळे तेथील राजकारण तापलं आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा जळगाव येथे होती. त्यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावण्यात आले होते. मात्र विरोधकांकडून ते फाडण्यात आल्याने शिवसैनिक तापले आहेत. अशातच एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरेंना डिवचण्याचं काम केलं आहे.

किशोर पाटील यांचा हल्लाबोलः 

आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे, असं देखील किशोर पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच असे कितीही आले आणि कितीही गेले तरी मला फरक पडत नाही, असा हल्लाबोल पाटलांनी केला.

याबाबत मीडियाशी संवाद साधत असताना किशोर पाटील यांनी मी या मतदारसंघातून हॅट्रिक करणार आहे, हे मी तुम्हाला डंके की चोट पर सांगतो, असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो कार्यालयातून काढायला उशीर झाला, मात्र फोटो लवकरच निघतील. माझ्या हृदयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो कोरलेला आहे आणि तो कोणीही काढू शकत नसल्याचं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेमध्ये आपली बहीण गेली असल्याचं आपल्याला वाईट वाटतं, असं पाटलांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांची बहीण ग्रामपंचायतला सुद्धा निवडून आलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडत असताना भावनिक बोलून मतदार संघात विकासाचा प्रकाश टाकता येत नाही. आम्हाला गद्दार म्हणतात मग शिवसेनेने युतीतून बाहेर पडून काँग्रेस सोबत आघाडी केली, तुमचे हे कृत्य महाराष्ट्राची गद्दारी नव्हता का?, असा सवाल किशोर पाटील यांनी केला आहे.

गुलाब पाटलांचं कार्यकरत्यांना आवाहनः

दरम्यान, आदित्य ठाकरे आज जळगाव येथे आले. शिवसंवाद यात्रेचा हा चौथा टप्पा आहे. आदित्य ठाकरे थेट बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये आले. यानंतर तेथील वातावरण बरच तापलं. मात्र कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी व मतदारसंघातील वातावरण तापून न देण्यासाठी गुलाबराव यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केलं आहे. यावेळी ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या, त्यांना रोखू नका, त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करू द्या, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. तर किशोर पाटील यांनी मात्र आदित्य ठाकरेंवर कडकडून टीका केली.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!