🕒 1 min read
मुंबई : ठाण्याजवळील एका दुर्घटनेनं आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. या घटनेवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत निशाणा साधला. 15 ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. याच दिवशी ठाण्याजवळील मोखाडा तालुक्यात बोटोशी हे अतिदुर्गम गाव आहे. येथील रहिवासी वंदना बुधर या आदिवासी महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यानंतर वंदनाला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने मोखाड्यातील डॉक्टरकडे नेण्याचा गावकऱ्यांनी ठरवलं. दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता तसेच ना वाहन होतं. त्यामुळे तिला डोळीतून तीन किलोमीटर मुख्य रस्त्यावर आणलं गेलं. मात्र, तोपर्यंत वंदनाची जुळी मुलं मुसळधार पावसात डोळीतच मृत्यू झाली.
उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर निशाणा –
या दुर्घटनेमुळे आरोग्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला काय झालं आहे?, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाला पडला आहे. अशातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल करत, पालघर मधील साधू हत्याकांड इतकाच वंदना बुधर यांच्या जुळ्या मुलांचा गंभीर मृत्यू झाला आहे, असं ठाकरे म्हणाले.
त्यामुळे आता केवळ चौकशीचा आदेश देऊन भागणार नाही. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25000 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य 2259 महिला व बालविकास 1672, सामाजिक न्यायविकास साह्य 2673 आझादीचा अमृत महोत्सव 500, असे सर्व कोटीतील आकडे आहेत. शिवाय रस्त्यांसाठी देखील शेकडो कोटींचे सगळे आकडे असतानाही वंदना बुधरणे आपली जुळे मुले गमावली. कारण या पैशांचा विनयोग जनतेसाठी नाही तर आमदार खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकीवाल्यांच्या सरकारने निष्पाप जीवांचा बळी घेतला असून फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Uday Samant । हल्ला झाला त्याच ठिकणी घेणार सभा, दम असेल तर धक्का लावा; सामंतांचे शिवसेनेला आव्हान
- Mumbai | 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा करणार; मुंबई पोलीस यांना धमकीचा मेसेज
- BJP । “कंबोज यांचा रोख हा अजित पवारांकडे नसून तो राष्ट्रवादीचा…”; निंबाळकरांचा गौप्यस्फोट
- Dhananjay Mahadik | “आता राजकरणात महाभारत होणार…”, धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांना आव्हान
- Anil Parab । ५० थरांची दहीहंडी फोडायला बहुदा ते स्पेनला गेले असतील; अनिल परबांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
