🕒 1 min read
मुंबई : काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याने मुंबईचं वातावरण सुन्न करून टाकलं होतं. या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा मुंबई मध्ये दहशत निर्माण झाली आहे. मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला पाकिस्तान मधून एक मेसेज आला असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांना धमकी-
मेसेजमध्ये 26/11 सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा होणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळातच हा हल्ला होणार असल्याचं देखील धमकीमध्ये म्हटलं आहे.
राज्यभरात मोठ्या जल्लोष दहीहंडी साजरी झाली. यानंतर आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. तसेच लगेचच नवरात्रौत्सव आणि मग दिवाळी, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजवली आहे.
भारतातलेच लोक करणार मदत-
मुंबई पोलीस ट्राफिक कंट्रोल रूमला आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच 6 लोक मदत करणार असल्याचं देखील दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सणासुदीच्या काळात मुंबईवर हल्याचं सावट आलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Dhananjay Mahadik | “आता राजकरणात महाभारत होणार…”, धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांना आव्हान
- Anil Parab । ५० थरांची दहीहंडी फोडायला बहुदा ते स्पेनला गेले असतील; अनिल परबांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
- Eknath Shinde | बस झालं मर्यादा… आता गणेशत्सव जोरदार साजरा करायचा – एकनाथ शिंदे
- Abdul Sattar | कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार – अब्दुल सत्तार
- BJP vs Congress | भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या व्हिडीओवर भाजपने दिले प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
