BJP । मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. तर यानंतर काल लगेच भाजपचे माढाचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकर यांनी देखील आता मोठा दावा केला आहे.रणजिंतसिंह निंबाळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार असल्याचे मोठं वक्तव्य त्यांनी केलं होत.
कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचं मोठा नेता कोण याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव चर्चेत येऊ लागलं आहे. मात्र यानंतर आता पुन्हा एकदा खासदार निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोहित कंबोज यांनी काही ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. तसेच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असे म्हटले होते. मात्र मोहित कंबोज यांचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे नसून तो पक्षातील दुसराच नेता आहे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पाचवा नेता कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलं होत ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे. यानंतर पुढे दुसऱ्या एका ट्विटमध्ये कंबोज यांनी सिंचन घोट्यासंदर्भात भाष्य केले आहे. कंबोज यांनी या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नावं आहेत. पाचवी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तसेच ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’ असं देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ट्विटमधून मोहित कंबोज यांचा रोख हा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जातंय. मात्र यानंतर आता २०१९ साली बंद झालेल्या सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन होणार का ?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा सर्व चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र खासदार निंबाळकरयांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा पाचव्या नेता कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत.
https://youtu.be/lgz7BR8IrHc
महत्वाच्या बातम्या :
- Dhananjay Mahadik | “आता राजकरणात महाभारत होणार…”, धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांना आव्हान
- Anil Parab । ५० थरांची दहीहंडी फोडायला बहुदा ते स्पेनला गेले असतील; अनिल परबांनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
- Eknath Shinde | बस झालं मर्यादा… आता गणेशत्सव जोरदार साजरा करायचा – एकनाथ शिंदे
- Abdul Sattar | कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार – अब्दुल सत्तार
- BJP vs Congress | भाजप नेत्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याच्या व्हिडीओवर भाजपने दिले प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

