🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्ता बदल झाला. विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष सत्तेत आला. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश होता. मात्र त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते. ज्यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. हे पद भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे सोपवले जाईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र आज भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या पदासाठी कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते पण आता अचानक हे पद बावनकुळे यांना देण्यात आले आहे. तर आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. आगामी काळात होऊ घेतलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुशंगाने बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. ते पक्षाचे अनुभवी नेते आहेत त्यामुळेच त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विदर्भात चांगलाच प्रभाव आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. तसेच त्यांच्यामुळे भाजपला एक ओबीसी चेहरा मिळाला आहे ज्याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो.
बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना 2014 ते 2017 दरम्यान त्यांनी राज्याच्या उर्जामंत्री पदाची धुरा देखील सांभाळली आहे. मात्र असे असूनही 2019 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. तरी देखील नाराजी धरून न ठेवता त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांची हीच एकनिष्ठता त्यांच्या कामी आली आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. बावनकुळे यांच्यात संघटन कौशल्ये असल्याने पक्ष बांधणीसाठी ते चांगले काम करू शकतात, असा विश्वास पक्षश्रेष्ठीना आहे, त्यामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis | बापू कुटीमध्ये आल्यानंतर आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो – देवेंद्र फडणवीस
- Udayanaraje Bhosale। “…मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे”; उदयनराजेंच मोठं वक्तव्य
- Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक
- Girish Mahajan | “आता डबल इंजिनचं सरकार,राज्यात…” ; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया!
- Loksabha Election Survey | “आज लोकसभा निवडणूक झाली तर…” ; भाजप-शिंदे गटाला धक्का देणारा सर्व्हेचा निकाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
