Share

Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने एका मद्याच्या कंपनीच्या जाहिरातीची ऑफर नाकारली आहे. दक्षिण उद्योग व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी दावा केला आहे कि, अल्लू अर्जुनला मद्य कंपनीने 10 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. परंतु त्याने ती स्पष्टपणे नाकारली. त्याच्या या निर्णयामुळे आणि स्वतःच्या तत्त्वांचे पालन केल्याबद्दल मनोबाला यांनी अल्लूचे अभिनंदनही केले. अल्लू अर्जुन हा एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 7.5 कोटी रुपये फी घेतो. यापूर्वी त्याने एका तंबाखू कंपनीची जाहिरात करण्याची ऑफरही नाकारली होती.

सूत्रांच्या हवाल्यानुसार या गोष्टींची जाहिरात पाहून अल्लूच्या चाहत्यांनी अशा गोष्टींचे सेवन करावे अशी त्याची इच्छा नाही. या उत्पादनांच्या सेवनामुळे त्याचे व्यसन लागते. ज्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. जीव जाण्याचा धोकाही निर्माण होतो. त्यामुळे तो जे स्वतः सेवन करत नाहीत, त्याचा प्रचारही करणार नाही, अशी भूमिका अल्लू अर्जुनची आहे. त्यामुळेच त्याने हि कोट्यवधींची ऑफर नाकारली आहे. या बातमीमुळे अल्लू अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्वतः करत नाही, लोकांनीही करू नये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लूने तंबाखू कंपनीची करोडोंच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती आणि म्हणाला होता कि, मला चाहत्यांमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा प्रचार करायचा नाही. मी स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे चाहत्यांना तसे करण्यास मी सांगणार नाही. या कारणास्तव त्याने तंबाखू कंपनीच्या ब्रँडला जाहिरातीसाठी नकार दिला होता. अल्लू अर्जुन हा स्वतः मद्यपान किंवा धूम्रपान करत नाही आणि लोकांनी ते करू नये असा संदेशही तो देत असतो.

बॉलीवूड स्टार्सनेही नाकारल्या ऑफर

एकीकडे शाहरुख खान आणि अजय देवगण पण मसाल्याची जाहिरात करताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे जॉन अब्राहम याने मात्र कोट्यवधींच्या मद्याच्या आणि तंबाखूच्या जाहिराती करण्यास नकार दिला आहे. तो स्वतः खूप फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे तो त्याच्या चाहत्यांना वाईट गोष्टी घेण्यासाठी प्रभावित करू शकत नाही, असे याचे म्हणणे आहे. तर इमरान हाश्मी याने देखील सिगारेट कंपनीची जाहिरात नाकारली होती. त्यामुळे त्यांचं खूप कौतुकही झालं होतं.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!