Share

Loksabha Election Survey | “आज लोकसभा निवडणूक झाली तर…” ; भाजप-शिंदे गटाला धक्का देणारा सर्व्हेचा निकाल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेत दोन फूट पडल्यानंतर नुकतेच महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सत्ता परिवर्तनानंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नेस्तनाबूत करून शिंदे गटाच्या मदतीने 2024 मध्ये राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकहाती जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजप आणि शिंदे गटाला धक्का बसू शकतो.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने एक सर्वेक्षण केले आहे. यानुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप आणि शिंदे गटाला (एकनाथ शिंदे कॅम्प) मोठा धक्का बसू शकतो. महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढविल्यास शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपसाठी हा मोठा झटका-

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यावरून भाजप आणि शिंदे गटाने स्थापन केलेले सरकार राज्यातील जनतेला पसंत पडले नाही, असा अंदाज लावला गेला आहे. सर्वेक्षणानुसार, आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी यूपीएला 30 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. त्याचवेळी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 18 जागा मिळू शकतात. भाजपसाठी हा मोठा झटका ठरू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्या होत्या. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा त्यांनी जिंकल्या होत्या.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे फक्त 6 खासदार उरले-

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्ताबदलानंतर शिंदे गटाचे आमदार आणि खासदार भाजपसोबत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे फक्त 6 खासदार उरले आहेत. त्यानुसार शिंदे गट आणि भाजपच्या खासदारांचे सध्याचे संख्याबळ 36 आहे. मात्र, आज लोकसभा निवडणूक झाल्यास ही संख्या १८ जागांवर येईल. भाजपच्या जागांमध्ये थेट 50 टक्क्यांची घट होणार आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!