🕒 1 min read
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या वडील झाला आहे. पत्नी पंखुरी शर्मा हिने एका मुलाला जन्म दिला आहे. कृणालने त्याच्या इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो त्याची पत्नी पंखुरीसोबत दिसत आहे आणि तिच्या मांडीवर एक लहान बाळ दिसत आहे. कृणाल फोटोत बाळाच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने एक कॅप्शन शेअर केले आहे, ज्यामध्ये मुलाचे नाव समोर आले आहे. कृणालच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. कृणालचा भाऊ हार्दिकची पत्नी नताशानेही या जोडप्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
कृणाल पांड्याने आपल्या मुलाचा आणि पत्नी पंखुरी शर्मासोबतचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका चित्रात दोघेही आपल्या मुलाचे चुंबन घेताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत कृणाल आणि पंखुरी मुलाला एकटक बघताना दिसत आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये फोटो सोबत कृणालने मुलाचे नावही उघड केले आहे. त्याने पोस्टमध्ये “कवीर कृणाल पंड्या” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CgY4oqaLShm/?igshid=YmMyMTA2M2Y=
क्रुणाल सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. तो इंग्लंडमध्ये वॉरविकशायरकडून काउंटी क्रिकेट खेळणार आहे. कृणाल आणि मॉडेल पंखुरी शर्माचे डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाले होते. कृणाल पंड्या रॉयल लंडन चषकाच्या आगामी हंगामात वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळताना दिसणार आहे. त्याने या इंग्लिश क्लबशी करार केला आहे. २ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या रॉयल लंडन चषक स्पर्धेत वॉरविकशायर संघ ८ गट-टप्प्यात सामने खेळणार आहे. कृणाल आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला होता. त्याने १४ सामन्यात १८३ धावा देत १० विकेट घेतल्या होत्या. तसेच त्याने भारतासाठी १९ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari | आता जे राजकारण पाहतो, ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे – नितीन गडकरी
- Nitin Gadkari : राजकारण केव्हा सोडू, केव्हा नको असे वाटतेय; नितीन गडकरींनी सांगितली मन की बात
- Monkeypox | केरळ पाठोपाठ दिल्लीतही आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण; WHO कडून आरोग्य आणीबाणी घोषित
- Nitin Gadkari | … उंदरासारखे आमचे फोटो लावतात, स्वतःचा मोठा फोटो लावतात – नितीन गडकरी
- Rohit Pawar : “शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील पण निर्णय…”, रोहित पवारांच मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

