🕒 1 min read
दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसनंतर आता मंकीपॉक्सचा धोका वाढू झाला आहे. केरळ पाठोपाठ आता राजधानी दिल्लीत मंकीपॉक्स रोगाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. केरळमध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सची 3 प्रकरणे समोर आली आहेत. रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचे वय अंदाजे 31 वर्षे असून त्याला मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नव्हता तरी देखील त्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. सरकारने मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी 16 प्रयोगशाळांना मंजुरी दिली आहेत, त्यापैकी 2 प्रयोगशाळा केरळमध्ये आहेत.
मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेऊन WHO ने जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक ट्रेडॉस अधनॉम घेब्रेयेसस यांनी हा निर्णय शनिवारी जाहीर केला. विशेष म्हणजे ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये या संदर्भात एकमत झालेले नसतानाही ही आणीबाणी जाहीर केली गेली. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हा आजार रुग्णाच्या त्वचेच्या संपर्कात आल्याने पसरतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीचे कपडे, भांडी आणि बिछान्याला स्पर्श केल्यानेही मंकीपॉक्स पसरू शकतो. भारतासह 80 देशांमध्ये 16,886 रुग्णांना लागण झाली आहे. यापैकी युरोपमध्ये सर्वाधिक 11,985 लोक मंकीपॉक्सने बाधित झाले आहेत. या रोगाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : “मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती आणि अमित म्हणजे…”; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल
- National Awards 2022 | राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’ नाही; वाचा विवेक अग्निहोत्री काय म्हणाले
- Shivsena : चंद्रकांत पाटील किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत, तेही पाहूयात; शिवसेनेने उडवली खिल्ली
- Devendra Fadnavis | “राऊतांविषयी कशाला विचारता, सेन्सिबल माणसाबद्दल विचारा”; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
- Raj Thackeray : उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात एक आणि करतात दुसरेच; राज ठाकरेंचा टोला


